प्रेरणास्रोत

*  क्लॉडीन एशेरनियर  *
होली क्रॉस संस्थेच्या संस्थापिका

" आणि जगातील जे हीनदीन, जे धिक्कारलेले व जे शुन्यवत् " अशांना देवाने निवडले.   ( 1 करिंथ 1: 28)

                        1801 - 1869                          

मदर बद्दल माहिती

मदर क्लॉडीन या होली क्रॉस संस्थेच्या  संस्थापिका आहेत. त्यांचा जन्म 29 मे 1801 साली फ्रान्स मधील सोवाई या लहानश्या खेडेगावात एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव अ‍ॅन व वडिलांचे नाव फ्रान्सीस एशेरनियर होते.  परिस्थिती गरिबीची असल्यामुळे त्यांच्या वडिलांना मुलांचे शिक्षण करणे शक्य नव्हते. पण त्यांनी मुलांना धार्मिक शिक्षण दिले.

मदर क्लॉडीन यांना नऊ भावंडे होती. त्यातील चार भावंडांचा व आईचा मृत्यु झाल्यानंतर  वयाच्या 15 व्या वर्षीच त्यांच्यावर कुटुंबाची  जबाबदारी आली. घरात पैश्याची मदत व्हावी म्हणून त्यांनी माइएलेट  येथील एका शेतकर्याकडे मेंढपाळाचे काम केले.  तेथेच त्यांनी लिहिणे व वाचणे  सुरु केले.

14 ऑक्टोबर 1828 मध्ये  फ्रा. जोसेफ हे शावनोड येथे फादर म्हणून नियुक्त झाले. आणि मदार क्लॉडीन या तेथे हाऊसमेड म्हणून काम करू लागल्या.  त्यावेळी त्या 27 वर्षाच्या होत्या. चर्चचे काम करीत असतांना त्या तेथील मुलींना गोळा करून लिहिणे व वाचणे शिकवू लागल्या.आणि सोबत धार्मिक शिक्षण देत. अश्याप्रकारे त्या तेथील लहान शाळेच्या शिक्षिका झाल्या.

          त्यांचे मुख ध्येय  मुलींमध्ये चांगली मनोवृत्ती जागवणे  हे होते. तसेच त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करून स्वावलंबी बनवणे हे होते
त्या म्हणत “ देवाला भिऊन  वागा, देवाची आज्ञा पाळा, देवावर विश्वास ठेवा, सर्वांशी प्रेमाने , सहकार्याने व बंधुभावाने राहा

फादर पिटर ममियर यांनी क्लॉडीन यांचे काम पाहिले. त्यांची मुलींविषयीची काळजी , जबाबदारी व कार्याला पुढे नेण्याची उत्कंठा पाहून  सन 1838 मध्ये त्यांनी क्लॉडीन यांना मदार ही पदवी दिली.  फदर ममियर  यांच्या मार्गदर्शनाने  मदरांनी सन 1839 मध्ये सिस्टर ऑफ द क्रॉस संस्थेची स्थापना शावनोड येथे  केली.  

मदर क्लॉडीन देवाशी एकरुप होत्या. ज्याप्रमाणे देवाने या जगात साधे व नम्रतेचे जीवन जगले व जगाचे तारण केले, त्याच प्रमाणे मदरांनीही कार्य करण्याचा प्रयत्न केला. आणि देवाच्या देणगीच्या भागीदार झाल्या.

येशूचे दु:ख, त्याचे मरण  व त्याचे परत जिवंत होणे. या सर्वात सेवेद्वारे सहभागी  होण्याची देणगी देवाने त्यांना दिली. मदरांनी ही देणगी गरीब लोकांपर्यंत सेवेद्वारे पोहचवली.

वयाच्या 68 व्या वर्षी, 10 ऑगस्ट 1869 मध्ये नियमाप्रमाणे सकाळी 4 वाजता प्रार्थना करीत असतांनाच, येशू येशू म्हणतच देवाघरी  गेल्या .



मदर क्लाडीन यांची गुणवैशिष्टे


  • प्रार्थनामय जीवन
  • शिक्षणाची  आवड
  • क्षमाशीलता
  • वक्तशीरपणा
  • नम्रता
  • श्रमप्रतिष्ठा
  • दयाशीलता
  • आज्ञाधारकता
  • साधी राहणी
  • शेजाऱ्यांवर प्रेम

***